Archives

आमच्या बद्दल
‘साप्ताहिक विवेक’ ने 2007 साली हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले. वृत्तपत्राच्या इतिहासात साठ वर्षांचा कालखंड लहान नाही. साप्ताहिकाच्या इतिहासात हा कालखंड तसा खूप मोठा समजला पाहिजे. विवेकपूर्वी सुरू झालेली आणि नंतर सुरू झालेली अनेक साप्ताहिके काल-प्रवासात लुप्त झाली आहेत. काळ बदलत असतो, तसे तंत्रज्ञान बदलते. लोकांच्या आवडीनिवडीसुद्धा बदलतात. कालानुरूप बदल करण्यात ज्यांना यश येते, ते कालप्रवाहात टिकून राहतात. साप्ताहिक विवेक पूर्वी मोठ्या आकारात (ब्लॉइड फॉर्म) निघत असे. आता तो मासिकाच्या आकारात निघतो. 1996 पर्यंत विवेकचे मुखपृष्ठ कधी कृष्णधवल तर कधी दुरंगी असे. आत्ताचे मुखपृष्ठ पूर्णपणे रंगीत असते. पूर्वी विवेक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वैचारिक लेखांनी भरलेला असे; आता माहिती देणारी आणि रंजन करणारी विविध सदरे ‘विवेक’मध्ये द्यावी लागतात.
काळानुरूप काही बदल ‘विवेक’मध्ये झाले असले, तरी काही बाबतीत अजिबात बदल झालेले नाहीत. ‘विवेक’ कशासाठी चालवायचा हे स्पष्ट आहे. विवेक केवळ माहिती देण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी चालवायचा नसून लोकजागृती करण्यासाठी चालवायचा, हा ‘विवेक’चा उद्देश आहे. तो साठ वर्षांपूर्वीही होता आणि आजही आहे.